या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा; IMD चा हवामान अंदाज पहा !

Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत असून राज्यभरात गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाल्याने वातावरण अस्थिर झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे, तर काही भागांत अचानक गारपीट आणि पावसाची नोंद होत आहे.

राज्यात गारपीट आणि पावसाचा इशारा

IMD च्या माहितीनुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

aajcha sonyacha bhav
आज सोन्याचा भाव धाडकन पडला; पहा तुमच्या शहरातील भाव !

विशेषतः यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. या भागांत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट

अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याने २२ आणि २३ मार्च रोजी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.

MS Dhoni Net Worth
धोनीने कशी कमावली 1000 कोटींची संपत्ती; येथे पहा!
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उपाय:
  • उन्हाळी भुईमुग पिकांसाठी तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.
  • रसशोषक किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इमिडाक्लोप्रिड १८.८% (२ मिली) किंवा क्विनॉलफॉस २५% (२० मिली) यापैकी एक किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.

मुंबई आणि कोकणात तापमान वाढ

मुंबई आणि कोकण भागात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्णतेची लाट जाणवत आहे. नागरिकांनी उन्हापासून संरक्षण घेण्यासाठी सावधगिरी बाळगावी आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र, उन्हाचा चटका कायम राहणार असल्यामुळे राज्यात उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे.

Ola S1 Pro
झाली स्वस्त; भारतातील सर्वात स्मार्ट आणि दमदार इलेक्ट्रिक स्कूटर !

नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

bank news
एप्रिलमध्ये 10 दिवस बँका बंद! तुमचे महत्त्वाचे काम अडणार नाही ना? त्वरित यादी पाहा!

Leave a Comment