Old Note Sell: लंडनमध्ये एक अनोखा लिलाव झाला आहे. 100 रुपयांची भारतीय नोट 56,49,650 रुपयांना विकली गेली आहे. ही नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 1950 मध्ये चलनात आणली होती,
ज्याचा अनुक्रमांक HA 078400 होता.
Old Note Sell: लंडनमध्ये एक अनोखा लिलाव झाला आहे. 100 रुपयांची भारतीय नोट 56,49,650 रुपयांना विकली गेली आहे. ही नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 1950 मध्ये चलनात आणली होती,
ज्याचा अनुक्रमांक HA 078400 होता. ही नोट ‘हज नोट’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशेष सिरिजचा भाग होती.
20 व्या शतकाच्या मध्यात, आरबीआयने विशेषत: हज यात्रेसाठी आखाती
देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंसाठी या नोटा चलनात आणल्या होत्या. सोन्याची बेकायदेशीर खरेदी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
विशेष म्हणजे या नोटांवर ‘HA’ लिहिलेले होते, ज्यामुळे त्या सहज ओळखता येत होत्या. या नोटा इतर भारतीय चलनी नोटांपेक्षा वेगळ्या रंगाच्या होत्या. या नोटा काही आखाती देशांमध्ये वैध होत्या, जिथे
भारतीय रुपया स्वीकारला गेला होता. जसे की UAE, कतार, बहरीन, कुवेत आणि ओमान, परंतु त्या भारतात चलनात नव्हत्या.
कुवेतने 1961 मध्ये स्वतःचे चलन सुरू केले, त्यानंतर इतर आखाती देशांनीही
ते चलन सुरू केले. याआधी कुवेतमध्ये फक्त भारतीय चलन वापरले जात होते. याचा परिणाम असा झाला की 1970 च्या दशकात हज नोटा देणे बंद झाले. आज, या नोटा दुर्मिळ मानल्या जातात आणि
चलन संग्रहामध्ये अत्यंत मौल्यवान आहेत, त्यांचे मूल्य स्थिती आणि दुर्मिळता यासारख्या घटकांवर अवलंबून असते.
10 रुपयांची नोट 12 लाखाला
लंडनमधील दुसऱ्या लिलावात 10 रुपयांच्या दोन जुन्या नोटांना मोठी मागणी होती. त्यापैकी एकाची किंमत 6.90 लाख रुपये आणि दुसऱ्याची किंमत 5.80 लाख रुपये होती. या नोटा सामान्य चलनात
नसून ऐतिहासिक कालखंडाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्या खूप लोकप्रिय आहेत.
25 मे 1918 रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटांना मोठे
ऐतिहासिक महत्त्व आहे कारण त्या पहिल्या महायुद्धाच्या काळातील आहे. त्यांचे खास आकर्षण म्हणजे एसएस शिराळा या ब्रिटीश जहाजाशी असलेले त्यांचे कनेक्शन. 2 जुलै 1918 रोजी,
एसएस शिराळाला जर्मन बोटीने उडवले होते त्यामुळे ती बुडाली. जहाज आणि त्याचा इतिहासाशी असलेला संबंध या नोटेवर आहे.

सोनाली कदम या एक कुशल आणि अनुभवी पत्रकार असून, त्यांना मुंबईतील पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षणाचा भक्कम आधार आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी विविध नामांकित डिजिटल माध्यमांमध्ये काम करत शेती, मनोरंजन, अर्थ, राजकारण, खेळ आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर व्यापक अनुभव आणि सखोल ज्ञान मिळवले आहे. त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि कामातील समर्पण यामुळे त्या वाचकांच्या मनात विश्वासार्हता आणि लोकप्रियता निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
Mere pass bhi hai old 10 rupees
good