Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. परंतु, या योजनेचे 2100 रुपये कधीपासून
लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये आपले नाव बघा
खात्यात जमा होतील? असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना पडला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत.लाडकी
बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता 2 कोटी 34 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला आहे. याशिवाय आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाते लिंक
करणाऱ्या 12 लाखांहून अधिक महिलांनाही फायदा झाला आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकी
दरम्यान वचन दिलं होतं की, जर महायुती पुन्हा सत्तेत आली, तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये दिले जातील. त्यामुळे महिलांना या रक्कमेची
प्रतिक्षा लागल्याचं सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे समोर आलंय.
रिपोर्ट्सनुसार, नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून
1500 रुपयांमध्ये वाढ करून 2100 रुपये केलं जाऊ शकतं. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या
लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये आपले नाव बघा
माध्यमातून पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं.
परंतु, राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीनं पैसे वाढवणं कठीण होईल,
असं बोललं जात आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढवण्याची शक्यता धुसर आहे. मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प असेल, त्यानंतर या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत
निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थसंकल्पात निधीची घोषणा केल्यानंतर लाभार्थी महिलांना 2100 रुपये दिले जातील. अशातच 2100 रुपयांचा हफ्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून
लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये आपले नाव बघा
पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरिब कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

सोनाली कदम या एक कुशल आणि अनुभवी पत्रकार असून, त्यांना मुंबईतील पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षणाचा भक्कम आधार आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी विविध नामांकित डिजिटल माध्यमांमध्ये काम करत शेती, मनोरंजन, अर्थ, राजकारण, खेळ आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर व्यापक अनुभव आणि सखोल ज्ञान मिळवले आहे. त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि कामातील समर्पण यामुळे त्या वाचकांच्या मनात विश्वासार्हता आणि लोकप्रियता निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.