Kanda Market Update : आज रविवार दिनांक 05 जानेवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात 30 हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल (Pune Kanda Market) कांद्याची 20 हजार क्विंटल आवक झाली.
तर आज कांद्याला कमीत कमी 1700 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला.
Pune Kanda Market : आज रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात 30 हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 20 हजार क्विंटल आवक झाली.
तुमच्या बाजारपेठेतील भाव येथे पहा
आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Market) पारनेर बाजारात 2350 रुपये, भुसावळ बाजारात 2200 रुपये तर राहता बाजारात देखील 2350 रुपये असा सरासरी दर मिळाला.
तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 2400 रुपये मंगळवेढा बाजारात 2500 रुपये दर मिळाला.
तुमच्या बाजारपेठेतील भाव येथे पहा
आज रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला (Onion Market) 2200 दर मिळाला.
तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला 2800 रुपये दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजी नगर बाजारात 1700 रुपये, राहुरी बाजारात 800 रुपये, शिरूर बाजारात 2700 रुपये दर मिळाला.

सोनाली कदम या एक कुशल आणि अनुभवी पत्रकार असून, त्यांना मुंबईतील पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षणाचा भक्कम आधार आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी विविध नामांकित डिजिटल माध्यमांमध्ये काम करत शेती, मनोरंजन, अर्थ, राजकारण, खेळ आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर व्यापक अनुभव आणि सखोल ज्ञान मिळवले आहे. त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि कामातील समर्पण यामुळे त्या वाचकांच्या मनात विश्वासार्हता आणि लोकप्रियता निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.