विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेचा गाजावाजा केला. सरसकट सर्व महिलांचे अर्ज स्विकारण्यात आले. निवडणुका असल्यामुळे त्यावेळी सरकारला निकष तपासायला देखील वेळ मिळाला नसले,
किंवा मत्ताधिक्य कमी होण्याची भिती सरकाराला असेल, असे आपण समजूया… त्यामुळे आता महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा निकष तपासण्यात येणार आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्राच्या
पैसे परत घेणार यादीत तुमचे नाव पहा
अग्रलेखातून सरकारवर खोच टीका करण्यात आली आहे.
सर्वसामान्य महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन देत सरकारने लाखो अर्ज स्वीकृत केले. मात्र, आता निवडणुका पार पडल्यावर या योजनांवर पुनर्विचार सुरू झाला आहे. ५० लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली
जात असून, त्यांच्याकडील पैसेही परत घेण्यात येत आहेत, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
निकष तपासण्याचे आदेश, अग्रलेखात काय म्हटलं?
सत्तेवर आल्यावर, सरकारने या योजनेत अर्ज केलेल्या महिलांचे निकष तपासण्याचे
आदेश दिले आहेत. या प्रक्रियेत अनेक महिलांना अपात्र ठरवले जात असून, त्यांच्याकडील रकमेचा परतावा सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील
एका महिलेच्या खात्यात जमा झालेले ७५०० रुपये परत सरकारजमा करण्यात आले. यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
घोषणाबाजीची फसवणूक?
विधानसभा निवडणुकीच्या काळात, सत्ताधारी पक्षांनी महिलांना आपले ‘लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ’ असल्याचे भासवले होते. मात्र, आता सत्तेवर आल्यानंतर हेच नेते निकषांच्या नावाखाली
महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला जात आहे.
महिलांमध्ये नाराजीचा सूर
या योजनेच्या बदललेल्या अटींमुळे महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. आर्थिक मदतीची गरज असलेल्या महिलांना अचानक अपात्र ठरवले जात आहे, आणि त्यांची रक्कम परत घेतली जात असल्याने महिला
वर्गामध्ये सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे.
योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह
सध्या ‘लाडकी बहीण योजना’ अडचणीत सापडली आहे. योजनेची अंमलबजावणी कशी होईल आणि अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महिलांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या योजनेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. सरकारने केलेल्या आश्वासनांची पूर्तता होईल की निवडणुकीपूर्वीच्या घोषणांप्रमाणेच त्याही जुमलेबाजी ठरतील, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

सोनाली कदम या एक कुशल आणि अनुभवी पत्रकार असून, त्यांना मुंबईतील पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षणाचा भक्कम आधार आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी विविध नामांकित डिजिटल माध्यमांमध्ये काम करत शेती, मनोरंजन, अर्थ, राजकारण, खेळ आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर व्यापक अनुभव आणि सखोल ज्ञान मिळवले आहे. त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि कामातील समर्पण यामुळे त्या वाचकांच्या मनात विश्वासार्हता आणि लोकप्रियता निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.